Advertisement

करी रोड, एल्फिन्स्टन पूल 'वन वे'वरुन शिवसेनेचं आंदोलन


करी रोड, एल्फिन्स्टन पूल 'वन वे'वरुन शिवसेनेचं आंदोलन
SHARES

मुंबईतील करी रोड आणि एल्फिन्स्टन पुलावर सतत वाहतूककोंडी होेेते. ही वाहतूककोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या पुलांवरील वाहतूक एकेरी करण्याचा प्रयोग हाती घेतला होता. हा प्रयोग १ ते १५ जून पर्यंत चालणार होता. त्याप्रमाणे सोमवारी या पुलांवरील वाहतूकही एकेरी करण्यात आली होती.

मात्र, वाहतूक पोलिसांच्या या प्रयोगाचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांना होणारा हा त्रास लक्षात घेत शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी या प्रयोगाविरोधात सोमवारी सकाळी १० वाजता करीरोड पुलावर आंदोलन केलं. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे पोलिसांनी नमतं घेत या पुलांवर पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू केली.


म्हणून हा प्रयोग केला

करी रोड आणि एल्फिन्स्टन पुलांजवळील मोठमोठे मॉल, टोलेजंग इमारती आणि पंचतारांकित हॉटेल्स यांच्याकडून आलेल्या दडपणामुळे वाहतूक पोलिसांनी हा प्रयोग केला होता. या प्रयोगाचा स्थानिक प्रवाशांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे शिवसेनेने करी रोड पुलावर रास्तारोको आंदोलन केलं.

पुलाजवळील स्थानिकांना या प्रयोगाबद्दल पत्र पाटवा. नोटीस लिहा. मात्र पोलिसांनी तसं न करता अचानक 'वन वे' केला. त्यामुळे आम्ही आंदोलन केलं. या आंदोलनानंतर दोन्ही पुलांवरील दुहेरी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
- अजय चौधरी, शिवसेना आमदार

शिवसेनेने केलेल्या या आंदोलनात शेकडो स्थानिकांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात त्यांनी पुलांवरील बॅरीगेट्स काढले.

या मार्गांवर एकेरी वाहतूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील भारतमाता सिनेमा जंक्शन येथून महादेव पालव मार्गाने शिंगाटे मास्तर चौकाकडे जाणारी वाहतूक 'एक दिशा मार्ग' करण्यात आली होती. सेनापती बापट मार्गावरील संत रोहिदास चौक येथून परळ टी.टी. जंक्शनकडे जाणारी वाहतूक 'एक दिशा मार्ग' करण्यात आली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा