Advertisement

कोकणवासीयांसाठी विशेष दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आता २४ डब्यांसह धावणार


कोकणवासीयांसाठी विशेष दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आता २४ डब्यांसह धावणार
SHARES

गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. अशातच अनेकजण हे गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावची वाट धरतात. त्यामुळं या नागरिकांची गैर सोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाड्या सोडते. याच पार्श्वभूमीवर आता कोकणवासीयांसाठी विशेष दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आता २४ डब्यांसह धावणार आहे. कोकण रेल्वेने याबाबत माहिती दिली.

गौरी-गणपतीनिमित्त कोकणातील रेल्वे गाड्यांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता तुतारी एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१००३/०१००४ दादर-सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्स्प्रेस आता २४ डब्यांसह धावणार आहे. ४ ते २५ सप्टेंबर या काळासाठी ही गाडी धावणार आहे. सध्या १९ डब्यांसह ही गाडी धावत असून, हे बदल तात्पुरत्या स्वरूपातील असतील, असे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-कोकण मार्गावर ६३ अतिरिक्त रेल्वेगाड्यांची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. नुकत्याच घोषित झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त या गाड्या असणार आहेत, अशी घोषणा ट्विटरवरून करण्यात आली. दरम्यान, या गाड्यांबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी तूर्त कोणत्याही निर्बंधाची गरज नाही, असे राज्य आणि रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे यंदा उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी कोकणवासीय सज्ज झाले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा