Advertisement

डहाणू-पनवेल मेमू उमरोळीला थांबलीच नाही, मोटरमनवर कारवाई होणार


डहाणू-पनवेल मेमू उमरोळीला थांबलीच नाही, मोटरमनवर कारवाई होणार
SHARES

उमरोळी स्थानकात डहाणू-पनवेल मेमू ट्रेन न थांबवल्यामुळे या लोकलच्या मोटरमनवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रशांत जैन असं या मोटरमनचं नाव असून लवकरच त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.


चेन खेचून थांबवली ट्रेन

डहाणू येथून सकाळी ५.५४ ला सुटणारी पनवेल मेमू उमरोळी प्लॅटफॉर्मवर थांबलीच नाही. ट्रेन का थांबली नाही, हे आतल्या प्रवाशांना आधी कळलंच नाही. पण नंतर त्यांनी चेन ओढली आणि ट्रेन थांबवली. तोपर्यंत ट्रेन उमरोळी पेट्रोल पंपावर पोहोचली होती. पुढे ७ ते ८ मिनिटांचा थांबा घेऊनही गाडी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली नाही. त्यामुळे मोटरमनवर कारवाई व्हावी, यासाठी पालघर स्टेशन अधिक्षकाला उमरोळीकर आणि डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने घेराव घातला.


अंधेरी लोकलही झाली लेट

लोकल उमरोळी स्थानकावर न थांबल्यामुळे प्रवाशांनी रेलरोको केल्याचंही सांगण्यात आलं. डहाणू-पनवेल मेमू ट्रेन न थांबल्यानं त्यामागून येणारी अंधेरी लोकलही प्रवाशांनी अडवली. केळवे रोड या स्थानकात ही घटना घडली. या सर्व प्रसंगांमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २൦ मिनिटे उशिराने सुरू होती.


प्रशांत जैन यांना आम्ही अजून निलंबित केलेलं नाही. त्यांच्याकडून चूक झाली आहे. पण, आम्ही सखोल चौकशी करुनच योग्य ती कारवाई करू.

मुकुल जैन, डीआरएम, पश्चिम रेल्वे

सकाळी कार्यालयात जाण्यासाठीची गाडी चुकल्यामुळे प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. शिवाय, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा