डेब्रिजमुळे नागरिक त्रस्त

 Charni Road
डेब्रिजमुळे नागरिक त्रस्त

ठाकूरद्वार - गेल्या अनेक दिवसांपासून जे. एस. एस. रोड इथल्या 12 मोती सदन इमारतीला लागून मोठ्या प्रमाणात डेब्रिज पडून अाहे. या भागात त्याच इमारतीच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक गटाराचे बांधकाम करण्यात अाले. त्यावेळी बाहेर पडलेले डेब्रिज कंत्राटदाराने न उचलल्याने हे डेब्रिज तसेच पडून आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांना रोज अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हे डेब्रिज लवकरात लवकर उचलले जावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या बाबत नागरिकांशी संवाद साधला असता या भागात झालेल्या या सोयीचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला असल्याचं तिथले रहिवासी शेखर शास्त्री यांनी सांगितले.

Loading Comments