Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांमधील कोरोना संक्रमणात उल्लेखनीय घट


बेस्ट कर्मचाऱ्यांमधील कोरोना संक्रमणात उल्लेखनीय घट
SHARES

गेल्या ४५ दिवसांत बेस्ट कर्मचाऱ्यांमधील कोरोना संक्रमणात उल्लेखनीय घट झाली आहे. ‘ऑपरेशन शून्य मृत्यू’अंतर्गत वेळेत निदान आणि उपचारांच्या अनुकूल परिणामांसाठी पालिकेने बेस्ट आगारांमध्ये ५७ जलद प्रतिजन चाचणी शिबिरे घेतली.

आतापर्यंत ५ हजार १९८ सर्वसाधारण कर्मचाऱ्यांची प्रतिजन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी फक्त ३२ (०.६ टक्के ) कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी २५ कर्मचारी पूर्णपणे बरे झाले आहेत आणि फक्त ७ कर्मचारी उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार ५ टक्क्यांपेक्षा कमी संक्रमण हे प्रमाण चांगले लक्षण मानले जाते. आजपर्यंत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी वैद्यकीय विभागाने आवश्यकतेनुसार सर्व वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा पुरवठा केलेला आहे. रोज सरासरी ५०० कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते.

३० हजारपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी, डी व झिंक गोळ्यांच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. २ हजार उच्च जोखीमधारक व ३ हजार कमी जोखीमधारक कर्मचाऱ्यांना कर्तव्यापासून आराम देण्यात आलेला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा