Advertisement

‘मेट्रो ३’ मार्गावरील मेट्रोची चाचणी लांबणीवर

कुलाबा ते सीप्झ या 'मेट्रो ३' मार्गिकेवर या महिनाअखेरीस चाचणी घेण्यात येणार होती. मात्र या महिन्यात सुरू होणाऱ्या चाचण्या लांबणीवर पडल्या आहेत.

‘मेट्रो ३’ मार्गावरील मेट्रोची चाचणी लांबणीवर
SHARES

कुलाबा ते सीप्झ या 'मेट्रो ३' मार्गिकेवर या महिनाअखेरीस चाचणी घेण्यात येणार होती. मात्र या महिन्यात सुरू होणाऱ्या चाचण्या लांबणीवर पडल्या आहेत. चाचणीसाठी मेट्रो गाडी अद्याप मुंबईत दाखल न झाल्याने चाचण्यांना विलंब झाला आहे.

ही मेट्रो गाडी कारखान्यातून मुंबईत आणण्यास अद्याप सुरुवात झाली नाही. परिणामी पुढील महिन्यातही चाचण्या सुरू होणार की नाही याबाबत साशंकता आहे. मेट्रो ३ची पहिली गाडी डिसेंबर २०२१ अखेपर्यंत मुंबईत दाखल होईल, असे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सांगण्यात आले होते. मात्र ही वेळ चुकल्यानंतर ही गाडी मार्चमध्ये मुंबईत दाखल होऊन मार्च अखेरीस चाचण्या सुरू होणार असल्याची माहिती मिळते.

मेट्रो गाडीच्या चाचणीसाठी मरोळ मरोशी रोड येथे तात्पुरत्या कारशेडची उभारणी करण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस कारशेडची उभारणी करून चाचणी सुरू करण्याचा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरशनचा (एमएमआरसीएल) विचार होता. त्यासाठी मेट्रो ३ ची एक प्रोटोटाइप ट्रेन आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील कारखान्यात तयार आहे. ही गाडी मुंबईत दाखल झाल्यानंतर मार्च अखेरीस चाचणी सुरू होणे अपेक्षित होते.

आरे येथील मरोळ-मरोशी रोड ते मरोळ भूमिगत स्थानकादरम्यानच्या ३ किमीच्या अंतरावर ही चाचणी होणार आहे. प्रोटॉटाइप गाडीची १० हजार किमी अंतरावरील चाचणी ३ ते ५ किमी अंतरावर घेतली जाईल. यात गाडीचा वेग, ऑसिलेशन आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचण्यांसह इतर प्रणालींच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांना दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा