अत्यावश्यक प्रवास मोफत करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना १६-१८ तास काम करून घरी परतण्यासाठी किंवा घरातून कामावर जाण्यासाठी त्यांना पूर्वीपेक्षा चार पट अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळं हा प्रवास मोफत करावा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अत्यावश्यक प्रवास मोफत करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
SHARES

कोरोना संसर्गजन्य असल्यानं गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन केलं असून रेल्वेसेवाही बंद केली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं राज्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, सध्या या पूर्वीपेक्षा चार पट अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवास मोफत करावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना १६-१८ तास काम करून घरी परतण्यासाठी किंवा घरातून कामावर जाण्यासाठी त्यांना पूर्वीपेक्षा चार पट अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळं हा प्रवास मोफत करावा करण्याची मागणी करण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळख पत्र पाहून लोकलप्रवासाची मुभा होती. सध्या रेल्वे मंडळाने लोकल आणि मेल-एक्स्प्रेस बंद केल्या आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना एसटीचा आधार घेऊन रेल्वेच्या तुलनेत चौपट पैसे देत प्रवास करवा लागत आहे.

कल्याण-दादर प्रवासासाठी एसटीचे ७५ रुपये तिकीट असून, याच टप्प्यासाठी रेल्वे प्रवासासाठी १५ रुपये आकारले जातात. करोनाचा प्रतिकार करण्यासाठी २४ तास काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना या अडचणीच्या प्रसंगात सरकारनं अत्यावश्यक प्रवास मोफत करावा', असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.   

करोनाच्या संकटात पोलिस, आरोग्य, सफाई या आणि अन्य अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी-अधिकारी दिवसरात्र राबत आहेत. याची दखल म्हणून त्यांना ३१ मार्चपर्यंत एसटी आणि बेस्टप्रवास मोफत करावा. 


प्रवास टप्पा एसटी भाडे रेल्वे भाडे
कल्याण-दादर 
७५ १५
पनवेल-दादर 
६० २०
ठाणे-दादर ४५ १०
बदलापूर-कल्याण 
४० १०


संबंधित विषय