Advertisement

विमान प्रवासात मास्क अनिवार्य, अन्यथा करता येणार नाही प्रवास

विमान प्रवाशासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार प्रवाशांना विमान प्रवासा दरम्यान कोविड नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे.

विमान प्रवासात मास्क अनिवार्य, अन्यथा करता येणार नाही प्रवास
SHARES

विमान प्रवास करताना आता मास्क घालणं अनिवार्य आहे. मास्क नसल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.  विमान प्रवाशासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.  यानुसार प्रवाशांना विमान प्रवासा दरम्यान कोविड नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे. 

प्रवासादरम्यान मास्क घालणे आणि सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक असेल. डायरेक्ट्रेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) यांच्यानुसार, जर प्रवासादरम्यान प्रवाशांनी नियमांचं पालन केले नाही तर त्यांना सुरक्षा यंत्रणेकडं सोपवलं जाऊ शकतं.  त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.

नवीन नियम

- विमान प्रवासात मास्क घालणं बंधनकारक आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणंही आवश्यक आहे. जर एखाद्या प्रवाशाने मास्क लावला नाही तर त्याला प्रवास करु दिला जाणार नाही.

- विमानतळाच्या प्रवेशद्वारावर तैनात सुरक्षा कर्मचारी मास्क घातल्याशिवाय कोणालाही विमानतळावर प्रवेश करण्याची परवानगी देणार नाहीत. 

- विमानतळ संचालक / टर्मिनल व्यवस्थापक हे पाहतील की, प्रवासी विमानतळ आवारात योग्य प्रकारे मास्क घालत आहेत आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आहेत की नाही.

- जर कोणत्याही प्रवाशाने कोविड नियमांचं पालन केलं नाही, तर त्याला इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणांकडे सोपवण्यात येईल. विमानात जर एखाद्या प्रवाशाने वारंवार इशारा देऊनही योग्य प्रकारे मास्क घातला नाही तर त्याला टेक ऑफ पूर्वीच डी-बोर्ड करण्यात येईल.

- जर प्रवाशाने वारंवार इशारा देऊनही नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा