Advertisement

...तर रेल्वेला तोटाच झाला नसता


...तर रेल्वेला तोटाच झाला नसता
SHARES

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी मध्य आणि पश्चिम रेल्व स्टेशनवर सरकते जिने बसवले आहेत. याच संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून एक माहिती उघडकीस आणली आहे. जी सर्वांनाच गोंधळात टाकणारी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेत बसवलेले सरकते जिने सारखे असले तरी त्यांच्या किंमती मात्र एकसमान नसून त्यात खूप तफावत असल्याची माहिती अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणली आहे.

मध्य रेल्वेच्या 14 स्टेशनवर 20 सरकते जिने बसवले असून त्यांची एकूण किंमत 11,90,60,388 रुपये इतकी आहे. दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्टेशनवर बसवलेल्या 8 सरकत्या जिन्यांसाठी 4.35 कोटी रुपये लागले होते. प्रत्येकी एक सरकत्या जिन्यासाठी 54,37,500 रुपये खर्च झाला आहे.

उल्हासनगर, भांडुप आणि विद्याविहार येथे बसवण्यात आलेल्या 4 सरकत्या जिन्यांसाठी 3,09,93,750 रुपये खर्च झाले असून एक सरकत्या जिन्यासाठी 77,48,437.5 रुपये इतका खर्च झाला आहे. कांजूरमार्ग स्टेशनवर बसवलेल्या सरकत्या जिन्यासाठी 76,96,000 रुपये खर्च झाला आहे. विक्रोळी स्टेशन येथील सरकते जिने बसवण्यासाठी 72,62,625 रुपये इतका खर्च झाला आहे. मुलुंड स्टेशनवरील सरकत्या जिन्यासाठी 77,45,309 रुपये खर्च झाले आहे. नागपूर स्टेशनवर 2 सरकते जिने बसवण्यात आले असून त्यासाठी एकूण 1,09,32,900 रुपये इतका खर्च झाला आहे, प्रत्येकी एक सरकत्या जिन्यासाठी 54,66,450 रुपये इतका खर्च झाला आहे. गुलबर्गा स्टेशनवर 2 सरकते जिने अनुक्रमे 54,77,268 आणि 54,52,536 रुपयांचा खर्च झाला आहे. अनिल गलगलींनी ही माहिती माहिती अधिकारातून उघडकीस आणली आहे.

पश्चिम रेल्वेच्या 13 स्टेशनवर 34 सरकते जिने बसवले आहेत. एका सरकत्या जिन्याची किंमत 72.28 लाख रुपये असून एकूण 1 कोटी 8 लाख रुपये खर्च झाले आहेत. अंधेरीत 7, भाईंदर स्टेशनमध्ये 1, बोरिवलीत 5, दादरमध्ये 2, विलेपार्लेत 1, गोरेगाव येथे 6, कांदिवलीत 1, वसई रोड येथे 2, नालासोपारात 1, सुरतमध्ये 2, वडोदरात 2, रतलाममध्ये 2 आणि अहमदाबाद येथे 2 असे एकूण 34 सरकते जिने बसवले आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व स्टेशनवर एकाच कंपनीला कंत्राट दिले गेले असते तर मोठ्या प्रमाणात पैशांची बचत झाली असती, असे सांगत अनिल गलगली यांनी प्रत्येक स्टेशनवर बसवलेल्या सरकत्या जिन्यांच्या किंमतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रेल्वे अर्थिक तोट्यात आहे. त्यामुळे प्रवाशांकडून पैसे उकळले जात आहे, असे न करता जर कामात पैसे वाचवले असते तर रेल्वे तोट्यात नसती. रेल्वेत होणारा भ्रष्टाचार थांबला असता, असेही गलगली म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा