मध्य रेल्वेवरील (central railway) दिवा (diva) स्थानकावर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. यामुळे दिवा रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) पर्यंत थेट लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तसेच दिवा प्रवासी (passengers) संघटनेने 14 ऑगस्ट रोजी कोकण (konkan) रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्या दिवा इथे थांबवल्या आणि काळ्या फिती लावून निषेध केला.
मध्य रेल्वेवरील ठाणे आणि डोंबिवली दरम्यान दिवा हे अत्यंत वर्दळीचे स्थानक आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवा येथील लोकसंख्या वाढल्याने लोकल (local train) प्रवासी वाहतूकही वाढली आहे. त्या गर्दीवर नियंत्रण आणि गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे दिवा स्थानकातून लोकल ट्रेनच्या दरवाजाला लटकून जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. तसेच, दिवा स्टेशनवर सुमारे 1.26 लाख तिकिटांच्या विक्रीतून दैनंदिन महसूल सुमारे 6.62 लाख रुपये आहे.
मात्र, एवढी कमाई होऊनही दिवा-सीएसएमटी लोकल सुरू झालेली नाही. त्यामुळे 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता प्रवाशांना काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
तसेच कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची गरज आहे. उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा, वसई-विरार, ठाणे, मुलुंड, भांडुप येथे मोठ्या संख्येने कोकणी लोक राहतात. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी दिवा रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पूर्व, पश्चिम उपनगरातील कोकणी प्रवाशांसाठी दिवा स्थानक महत्त्वाचे आहे.
हेही वाचा