Advertisement

लोकलमधून आता दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना प्रवासाची मुभा

लोकल सेवा बंद असल्याने कर्करुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत होता. बसमध्ये गर्दी आणि रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीने प्रवास असह्य होत होता.

लोकलमधून आता दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना प्रवासाची मुभा
SHARES

मुंबईत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांकडून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. आता दिव्यांग आणि कर्करुग्णांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.


कोरोनामुळे अनेक महिने रेल्वे सेवा बंद होती. लॉकडाऊननंतर अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरु करण्यात आली. पण सर्वसामान्य लोकांना अजूनही रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हळूहळू सरकार प्रवासाची मुभा देत आहे. लोकल बंद असल्याने रस्ते वाहतूकीवर मोठा ताण पडत आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही लोकल सुरू करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. यावेळी काही नेत्यांनी लोकलमधून परवानगी नसताना प्रवास केला होता.


लोकल सेवा बंद असल्याने कर्करुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत होता. बसमध्ये गर्दी आणि रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीने प्रवास असह्य होत होता. यामुळे दिव्यांग प्रवाशांना वैद्यकीय उपचारासाठी लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी प्रवासी संघटनेने सरकारकडे केली होती. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता कर्करुग्णांचा त्रास कमी होणार आहे. त्यांना लोकलमधून उपचार करण्यासाठी जाता येणार आहे. 



हेही वाचा -
आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा