डी. के. शर्मा 'परे'चे नवे महाव्यवस्थापक

 Mumbai
डी. के. शर्मा 'परे'चे नवे महाव्यवस्थापक

मुंबई - पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल नुकतेच निवृत्त झाले असून त्यांचा कार्यभार मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

डी. के. शर्मा यांनी मध्य, पश्चिम, दक्षिण आणि कोकण रेल्वे या सर्व ठिकाणी महत्त्वपूर्ण पदाचा कार्यभार संभाळला आहे. डी. के. शर्मा हे भारतीय रेल्वे इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग सेवेतील 1980 चे वरिष्ठ अधिकरी आहेत. शर्मा यांच्या नियुक्तीनंतर आतातरी पश्चिम रेल्वेमध्ये सुधारणा होणार का? प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण होणार का? असा प्रश्न मुंबईकरांनी उपस्थित केलाय.

Loading Comments