डोंबिवली सर्वाधिक गर्दी असणारं स्थानक

 Dombivali
डोंबिवली सर्वाधिक गर्दी असणारं स्थानक
डोंबिवली सर्वाधिक गर्दी असणारं स्थानक
डोंबिवली सर्वाधिक गर्दी असणारं स्थानक
See all

गजबजलेली स्टेशनं म्हणून ख्याती असलेल्या चर्चगेट आणि सीएसटीची ओळख पुरती पुसली गेली असून, आता डोंबिवली या स्टेशनवर प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. कुर्ला स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी आता डोंबिवली स्थानकावर गेली आहे. सलग तिसऱ्यांदा मध्य रेल्वेचं डोंबिवली स्टेशन गर्दीचं स्टेशन ठरलं आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीत डोंबिवली पहिल्या स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर ठाणे, आणि तिसऱ्या क्रमांकावर घाटकोपर स्थानक आहे. कृर्ला ,विक्रोळी, बदलापूर या स्थानकांनाही डोंबिवलीने मागे टाकलं आहे. मुंबई सीएसटी स्थानकातील दर दिवशीच्या प्रवासी संख्येत मात्र कमालीची घट झाली.

तीन स्थानकांवरील आकडेवारी

2016-17 - डोंबिवली 2,46,161
2016-17 - ठाणे 2,43,243
2016- 17 - सीएसटी 1,41,387


मुंबई सीएसटी स्थानकातील दर दिवशीच्या प्रवासी संख्येत मात्र कमालीची घट झाली आहे. 2014-15 मध्ये या स्थानकातून दर दिवशी सरासरी 1,61,113 प्रवासी प्रवास करत होते. पण यंदाच्या वर्षी 2016-17 या वर्षांत ही संख्या 20 हजारांनी कमी होऊन 1,41,387 इतकी झाली आहे. ही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची स्थानके - 

डोंबिवली
ठाणे
घाटकोपर
कुर्ला
मुलुंड
सीएसटी
भांडुप
दिवा
विक्रोळी
शीव

Loading Comments