Advertisement

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं 'मरे' विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक सलग ५ दिवस विस्कळीत झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाकूर्ली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं लोकल जवळपास अर्धा तास उशिरानं धावत आहेत.

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं 'मरे' विस्कळीत
SHARES

मध्य रेल्वेची वाहतूक सलग ५ दिवस विस्कळीत झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाकूर्ली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं लोकल जवळपास अर्धा तास उशिरानं धावत आहेत. सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रासाला समोरं जावं लागतं आहे.

प्रवाशांची गर्दी

कल्याण-ठाकूर्ली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं धीम्या लोकलच्या वेळापत्रकावर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या आणि कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल रखडल्या आहेत. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यानं चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होत आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यानं डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच, वेगळ्या लाईनच्या गाड्या पकडून शक्यतो वेळेत कार्यालयात पोहचण्यासाठी प्रवाशांची धडपड होताना पाहायला मिळत आहे.

या बिघाडाची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली असून, दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. दरम्यान मध्य रेल्वेच्या दररोजच्या विस्कळीत होण्यावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.हेही वाचा -

कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी 'आयएमए'ची संपाची हाक

रोज 'म.रे' त्याला कोण रडे?संबंधित विषय