कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी 'आयएमए'ची संपाची हाक

कोलकाता इथं डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) सोमवारी संपाची हाक दिली आहे. डॉक्टरांवर सातत्यानं होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी 'आयएमए'नं केली आहे.

SHARE

कोलकाता इथं डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) सोमवारी संपाची हाक दिली आहे. डॉक्टरांवर सातत्यानं होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी 'आयएमए'नं केली आहे. याआधी मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'नं काम बंद आदोलन पुकारलं होतं. मात्र, आता खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर संपावर गेल्यानं रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वैद्यकीय सेवा बंद

सोमवारी सकाळी ६ वाजता या संपाला सुरुवात झाली असून, सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ असे २४ तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. मार्ड, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशन यांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. सरकारी रुग्णालयांची वैद्यकीय सुविधा सुरळीत सुरू राहणार असली तरीही या वेळेमध्ये डॉक्टर काम करताना काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार आहेत.

आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन

डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार अनेकदा घडले असून, त्यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत आणि हल्लेखोरांवरील कारवाईबाबत मागणी करण्यात आली आहे. मात्र, तरीही अशा घटनांना आळा बसलेला नाही. त्यामुळं यापुढे अशाप्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी हे काम बंद आंदोलन आहे. त्याशिवाय, सर्वसामान्यांनाही आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी या काम बंद आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन संघटनेनं केलं आहे.हेही वाचा -

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं?

पावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चासंबंधित विषय
ताज्या बातम्या