कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

SHARE

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास कोकणकन्या एक्रसप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं लोकल खोळंबल्या आहेत. तसंच, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमत आहे. 

इंजिनात बिघाड

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं (सीएसएमटी) येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला आहे. इंजिनात बिघाड झाल्यानं गाडी जागीच उभी आहेया गाडीच्या मागे जलद लोकल खोळंबल्या आहेत. त्यामुळं सीएसएमटी ते मशीद स्थानकांदरम्यान जलद मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या आहेत.

प्रवासी रेल्वे रुळावर

सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांना रुळांवरून चालत रेल्वे स्थानक गाठावं लागत आहेइंजिनातील बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्यानं अप जलद मार्गावरील लोकल उशिरानं धावणार आहेत.

गर्दीच्या वेळेत बिघाड

सकाळी ऐन प्रवाशांच्या कामावर जाण्याच्या वेळेत इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं प्रवाशांची चांगलीच गोची झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं दुरूस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं आहे. मात्र, हा बिघाड कधी दुरुस्त होईल याबाबत अद्याप माहिती मिळालेल नाही. त्यामुळं हा बिघाड दुरूस्त होईपर्यंत प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जाव लागणार आहे.हेही वाचा -

महापालिकेतील नगरसेवकांची कामगिरी घसरली, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

शिवसेना-भाजप युतीबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठकसंबंधित विषय
ताज्या बातम्या