Advertisement

शिवसेना-भाजप युतीबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक


शिवसेना-भाजप युतीबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक
SHARES

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटत नाही आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी नवी दिल्लीत जाऊन अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांची युती होणार का हे या बैठकीनंतरचं स्पष्ट होणार आहे.  

निम्म्या जागांची मागणी

युतीच्या चर्चेत १० ते १२ जागांचा प्रश्न अडकला आहे. तसंच, शिवसेनेची निम्म्या जागांची मागणी आता १३० वर पोहोचली आहे. परंतु, भाजप १२० जागा देण्यास तयार आहेघटकपक्ष भाजपबरोबर असल्यानं त्यांना १८ जागा दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय, शिवसेना ज्या ९ जागांवर कधीही निवडून आली नाही, त्या जागा शिवसेनेनं सोडल्या आहेत. परंतु, गिरीश बापट हे लोकसभेत निवडून गेल्याने कसबा पेठ व अन्य एखादी जागा तर नाशिकमध्येही येवला व अन्य एक-दोन जागा शिवसेनेला हव्या असल्याचं समजतं. मात्र, भाजपची त्यासाठी तयारी नसल्याची माहिती समोर येत आहे.

जागावाटपाचा तिढा

दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यानं पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी नवी दिल्लीला जाणार आहेत. शिवसेनेला जास्तीत जास्त किती व कोणत्या जागा द्यायच्या, हे त्यावेळी ठरविण्यात येणार आहे. या बैठकीस प्रभारी भूपेंद्र यादवही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीनंतर युतीसंदर्भातील निर्णय होईल व घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्याची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

पवारांवरील कारवाईचा सरकारशी संबंध नाही- मुख्यमंत्री

फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेची १०० कोटींची वसुली




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा