पवारांवरील कारवाईचा सरकारशी संबंध नाही- मुख्यमंत्री

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतरांवर ईडी (ED)कडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा तसंच राज्य सरकारचा कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिलं.

SHARE

सूडबुद्धीने कारवाई

शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात ईडीने शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, १०० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याचा तपास ईडी करते. त्यात राज्य सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे राज्य सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. 

चौकशी सुरू

मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घोटाळ्यात कुणाची काय भूमिका आहे याची चौकशी सुरू आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. राज्यात पुन्हा युतीचचं सरकार येणार असल्याने आम्हाला असे हातखंडे वापरण्याची गरज नाही, असंही फडणवीस म्हणाले.हेही वाचा-

ईडीचा पाहुणचार स्वीकारणार- शरद पवार

ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शनंसंबंधित विषय
ताज्या बातम्या