Advertisement

ठाण्यात प्रथमच ई-रिक्षा

पर्यावरणपूरक ई-रिक्षा आता ठाणे शहरात धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या सहकार्याने ठाणे शहरात प्रथमच ई-रिक्षाची सेवा सुरू केली जाणार आहे.

ठाण्यात प्रथमच ई-रिक्षा
SHARES

पर्यावरणपूरक ई-रिक्षा आता ठाणे शहरात धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या सहकार्याने ठाणे शहरात प्रथमच ई-रिक्षाची सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ रिक्षा प्रवास करता येणार आहे.खासगी ई-रिक्षाचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. 

ठेकेदारामार्फत चार ते पाच दिवसांत प्रयोगिक तत्त्वावर बॅटरीवर चालणाऱ्या ३० रिक्षा शहरात सुरू होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने या रिक्षांसाठी खास थांबा निश्चित केला आहे. या रिक्षांचे भाडे परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरांप्रमाणेच असणार आहे. 

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून प्रवासी बाहेर पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या ठिकाणी ठाणे महापालिकेने रिक्षा थांबाही उभारला आहे. मात्र, अनेकदा या थांब्याबाहेर रिक्षाचालक येऊन प्रवाशांची वाट अडवीत असतात. प्रवाशांना मीटरपेक्षा जादा दर आकारून लुटण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात उतरल्याक्षणी रिक्षांचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

या ई-रिक्षा उभ्या करण्यासाठी स्थानक परिसरातील वाहनतळाजवळ जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी ई-रिक्षांच्या बॅटरीही चार्ज करण्यात येतील.  या रिक्षामध्ये चार बॅटऱ्या वापरण्यात येणार आहेत. बॅटरी एकदा चार्च केल्यानंतर ती ६० किलोमीटपर्यंत चालेल.

बॅटरी संपल्यानंतर ती ठाणे स्थानक, तीन पेट्रोल पंप आणि मानपाडा कोठारी कंपाऊंड येथील केंद्रावर अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदलणे शक्य होणार. एखादी रिक्षा रस्त्यात बंद पडल्यास अवघ्या १५ ते २० मिनिटांत कंपनीचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होईल.  ई-रिक्षा चालविण्यासाठी परवान्याची गरज नाही. या रिक्षांचे भाडे मीटर रिक्षांप्रमाणेच असेल. या रिक्षेने इंधन बचत होते. तसेच प्रदूषण होत नाही. 



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा