Advertisement

सरकारी नोकरी शोधताय?


सरकारी नोकरी शोधताय?
SHARES

तुम्ही सध्या सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या रेल्वे विभागाने २ लाख पेक्षा जास्त रिक्त पद भरण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वेत एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पद भरण्याची ही पहिलीचे वेळ आहे. त्यामुळे यावर्षी रेल्वेत मेगाभरती होणार हे निश्चित. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी १लाख पेक्षा जास्त सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला.

गेल्या काही वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती रेल्वेत झाली नव्हती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी भरती प्रक्रीया वेगवान करण्याची सुचना दिली. त्यानुसार येत्या वर्षभारत २ लाखांच्यावर रिक्त भरण्यात येणार आहेत.


अशी आहेत रिक्त पदे

  • रेल्वेत एकूण २ लाख १७ हजार ३६९ रिक्तपद
  • १ लाख २२ हजार - सुरक्षाविषयक रिक्त पद
  • ४७ हजार रिक्त पद - विविध भागातील अभियंता
  • ४१ हजार रिक्तपद - गॅँगमनसाठी
  • १० हजार रिक्तपद - गार्डसाठी
  • ६ हजार ५० रिक्तपद – इलेक्ट्रीक सहायक
  • २ हजार ४४३ रिक्तपद – की मन
  • १ हजार ६३ रिक्तपद – गेट मन
  • १ हजार १६ रिक्तपद – केबिनमन


कुठे कराल रेल्वेभरतीसाठी अर्ज

रेल्वेतभरती होण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अश्या दोन्ही पध्दतीने अर्ज करता येऊ शकतो. www.railwayrecruitment.inही रेल्वेभरतीसाठी अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात.


रेल्वेभरतीसाठी ही शैक्षणीक पात्रता असणे गरजेचे

रेल्वेत भरती व्हायचे असेल तर किमान १० वी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे १२वी, ग्राज्यूएट, डिप्लोमा, आयटीआय, इंजिनिअरचे विद्यार्थी रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकता.


कसा कराल अर्ज?

www.railwayrecruitment.in या वेबसाईटवर ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे. त्यावर क्लीक करणे त्यानंतर एक अॅप्लीकेशन फॉर्म यावर क्लीक करणे- एक फॉर्म येईल – त्यात तुमची सगळी माहीती भरणे - नाव- इमेल अॅडरेस- अनुभव- आणि तुमचा बायोडेटा तीथे अॅटच करयाचा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा