Advertisement

प्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक

मुंबईत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण रोखता यावे यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली.

प्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक
SHARES

मुंबईत पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण रोखता यावे यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक असणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

'स्वच्छ गतिशीलता आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची बांधिलकी कायम ठेवत, महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून सरकारी / नागरी स्थानिक संस्था / कॉर्पोरेशनसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा किंवा भाड्याने देण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

राज्य सरकारने हा निर्णय यापूर्वीच घेतलेला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून होणार होती. मात्र १ एप्रिल ऐवजी आता १ जानेवारी २०२२ पासूनच होणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ट्विट करत ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

पर्यावरण प्रदूषणरहीत करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे त्यांनी आपल्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा