Advertisement

'मुंबई दर्शन' बस 5 ऑक्टोबरपासून बंद

ओपन डेक बस हद्दपार होणार

'मुंबई दर्शन' बस 5 ऑक्टोबरपासून बंद
SHARES

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डबल डेकर ओपन डेक बस (Double Decker Open Deck Bus) पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून हद्दपार होणार आहे.

परिणामी ओपन डेक बसमधून होणारे 'मुंबई दर्शन' (Mumbai Darshan) 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. त्यानंतर ओपन डेक बस चालवण्याचा सध्यातरी कुठलाही विचार बेस्ट (BEST) उपक्रमाचा नसल्याचा सांगण्यात आलं आहे. 

सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचा आयुर्मान संपल्यामुळे या जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. 

26 जानेवारी 1997 पासून एमटीडीसीच्या मदतीने ओपन डेक बस सेवा सुरु करण्यात आली होती. दर महिन्याला जवळपास 20 हजार पर्यटक या बस सेवेचा लाभ घेत असल्याची आकडेवारी आहे.सध्या बेस्टकडे 3 डबल डेकर ओपन डेक बस आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तिन्ही बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला आहे.

ही ओपन डेक बस नॉन एसी आहे. यात अप्पर डेक आणि लोअर डेक असतात. अप्पर डेक आणि लोअर डेकचं भाडं वेगळं आहे.

अप्पर डेक ओपन असल्याने यातून मुंबईची सफर करता येते. जेव्हा ही गाडी सुरु झाली तेव्हा मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट दिली जात असे. मात्र आता दक्षिण मुंबईमधील पर्यटन स्थळं या बसच्या माध्यमातून पाहता येत होत्या. 

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना ओपन डेक बसेसमधून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, एशियाटिक लायब्ररी, जुनं कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांची सफर घडवण्यात येत होती. 



हेही वाचा

जादा शुल्क आकारणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करा, व्हॉट्सअॅप क्रमांक जारी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा