Advertisement

चित्रपटाच्या शूटिंगमधून मध्य रेल्वेला २.४८ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेने २०२१- २२ या आर्थिक वर्षात चित्रपटाच्या शूटिंगसाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच ऑफर करून २.४८ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे.

चित्रपटाच्या शूटिंगमधून मध्य रेल्वेला २.४८ कोटींचे उत्पन्न
SHARES

मध्य रेल्वेने २०२१- २२ या आर्थिक वर्षात चित्रपटाच्या शूटिंगसाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच ऑफर करून २.४८ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. तसंच, आतापर्यंतचा एका वर्षातील हा सर्वाधिक महसूल आहे. विविध चित्रपट निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसद्वारे मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १० चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले ज्यामध्ये ६ फीचर फिल्म्स, दोन वेब सिरीज, एक शॉर्ट फिल्म आणि जाहिराती यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेला सर्वाधिक १.२७ कोटी '2 ब्राइड्स' या फीचर फिल्मचे शूटिंग येवला, कान्हेगाव स्थानकांवर विशेष ट्रेनसह एकंदर १८ दिवसांचे शूटिंगसाठी मिळाले. अदारकी रेल्वे स्थानकावर ९ दिवसांसाठी विशेष ट्रेनसह शूट केलेल्या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातून ६५.९५ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले.

या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या ६ महिन्यांत कोविड निर्बंध असूनही, मध्य रेल्वेने आपल्या अखंड प्रक्रियेने प्रॉडक्शन हाऊसना चित्रपटाच्या शूटिंगसाठी आपली स्थाने (लोकेशन्स) वापरण्यासाठी आकर्षित केले आणि हा विक्रमी महसूल निर्माण केला.

या आर्थिक वर्षातील २.४८ कोटी हे मध्य रेल्वेला चित्रपटाच्या शूटिंगमधून मिळालेले आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न असून २०१३-१४ या वर्षातील १.७३ कोटींच्या आधीचे सर्वाधिक उत्पन्नाला मागे टाकले आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये कडक कोविड निर्बंध असूनही ४१.१६ लाख महसूल मध्य रेल्वेने मिळविला होता.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे चित्रपट शूटिंग स्थान आहे, या युनेस्कोच्या जागतिक वारसा रेल्वे स्थानकावर यंदा ४ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये अर्शद वारसी आणि चित्रांगदा सिंग अभिनीत ‘मॉडर लव्ह – कटिंग चाय’ या चित्रपटाचा समावेश आहे.  चित्रपटाच्या शूटिंगची इतर ठिकाणे म्हणजे दुसरे सर्वात लोकप्रिय जुने वाडीबंदर यार्ड, सातारा जवळील अदारकी रेल्वे स्टेशन, येवला, मनमाड आणि अहमदनगरमधील कान्हेगाव स्टेशन, दादर, मुलुंड आरपीएफ मैदान आणि मुंबईकरांसाठी आकर्षण असलेले हिल स्टेशन, माथेरान रेल्वे स्टेशन होत.

"छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, जुने वाडीबंदर यार्ड, वाठार (सातारा जवळ) आणि आपटा स्थानक (पनवेल परिसरातील) यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांमुळे आणि प्रॉडक्शन हाऊसना कोणत्याही अडचणीशिवाय व विनाअडथळा परवानगी देण्याच्या  पद्धतीमुळे मध्य रेल्वेला चित्रपटाच्या शूटिंगमधून हे विक्रमी उत्पन्न मिळविता आले”,  असं महाव्यवस्थापक  अनिल कुमार लाहोटी यांनी म्हटलं.

‘मध्य रेल्वेवर याआधी स्लम डॉग मिलेनियर, कमिने, रब ने बना दी जोडी, रा-वन, रावन, प्रेम रतन धन पायो, दिलवाले दुलनिया ले जायेंगे, कुछ  कुछ होता है, दबंग, दरबार, रंग दे बसंती, बागी, खाकी, प्रेम रतन धन पायो आणि यांसारखे इतर अनेक गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसवर हिट झालेले चित्रपट चित्रीत झाले आहेत’, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी म्हटलं.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आपटा, पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा आणि तुर्भे आणि वाडीबंदर सारखी रेल्वे यार्ड यांसारखी लोकप्रिय स्थानके ही सर्वाधिक पसंतीची चित्रपट शूटिंग ठिकाणे होती.  चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात येते.

अलीकडेच चित्रपटाच्या शूटिंगची परवानगी जलद करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आली आहे, या प्रक्रियेच्या सोप्या पद्धतीमुळे चित्रपट कंपन्यांना अर्ज सादर केल्यानंतर परवानगी मिळणे शक्य होते.  यासाठी आवश्यक दस्तऐवजांसह स्क्रिप्ट आणि अर्जासह आवश्यकता नमूद करावी लागते. 

हेही वाचा - मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलची ६९ लाखांची कमाई

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा