Advertisement

गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मिळाले छत


गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मिळाले छत
SHARES

गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेच्या पादचारी पुलाची दुरुस्ती होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही या पादचारी पुलावर छत बसविण्यात आले नव्हते. यामुळे ऐन उन्हाळ्यात या पादचारी पुलाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना रखरखीत उन्हाचा सामना करावा लागत होता. अखेरी उशीराने का होईना, पण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या त्रासाची दखल घेत या पुलावरील छताचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या प्रवाशांची उन्हाच्या त्रासापासून सुटका होणार आहे.

चर्चगेटच्या दिशेने असलेला हा पादचारी पूल मागील तीनपेक्षा जास्त महिन्यांपासून छताविना होता. त्यामुळे हजारो प्रवाशांना दररोज रखरखत्या उन्हातून प्रवास करावा लागत होता. पश्चिम रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल्वे विकास कॉपेर्रेशन या दोघांचेही या कामाकडे दुर्लक्ष होत होते. या पुलावर छत बसविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून पश्चिम रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल्वे विकास कॉपेर्रेशन या दोघांमध्ये कलगी तुरा लागला होता. त्यामुळे या पुलावर छत बसविण्याचे काम अर्धवट राहिले होते. यामुळे रेल्वे प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करत स्थानक गाठावे लागत होते. लवकरच पावसालाही सुरूवात होणार असल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडणार होती.

अखेर प्रवाशांच्या तक्रारीनंतर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे या पादचारी पुलावर तात्काळ छत बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने पुलावर छत बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण केले आहे.

[हे पण वाचा-  गोरेगांव स्थानकावरील पुलावर नाही छप्पर]

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा