Advertisement

मेट्रो 2B, 4 आणि 9 चा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार

आरे-कफ परेडचा टप्पा एप्रिल 2025 मध्ये सेवेत दाखल होऊ शकतो.

मेट्रो 2B, 4 आणि 9 चा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पाचा आरे - बीकेसी टप्पा ऑक्टोबरमध्ये प्रवाशांचा सेवेसाठी सुरू होणार आहे. तर आरे - कफ परेड टप्पा एप्रिल 2025 मध्ये सुरू होणार आहे. ही 33.5 किमी लांबीची मेट्रो लाईन लवकरच सेवेत येणार आहे.

मात्र प्रवाशांना मुंबई (mumbai) महानगर क्षेत्रातील पुढील मेट्रो (metro) मार्गांसाठी 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (mmrda) सध्या सहा मेट्रो मार्गांवर काम करत आहे. त्यापैकी 'मेट्रो 2B' (metro 2B), 'मेट्रो 4' (metro 4) आणि 'मेट्रो 9' चा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मार्गांचा पहिला टप्पा सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवेत दाखल होणार आहे.

मात्र या सेवेसाठी प्रवाशांना एप्रिल-मे 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील 337 किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क 2031-32 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीएच्या (mmrda) 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाच्या 'मेट्रो 3' आणि 'मेट्रो 11' (वडाळा - सीएसएमटी) मार्गांच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) जबाबदार आहे.

उर्वरित मार्ग एमएमआरडीएकडून राबविण्यात येत आहेत. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो 1, 'दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2A' आणि 'दहिसर-गुंदवली मेट्रो 7' असे एकूण 47 किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क सध्या कार्यरत आहे.

आता आरे-बीकेसी दरम्यान 12.44 किमी लांबीच्या 'मेट्रो 3' प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केला जाईल.

तर आरे-कफ परेड दरम्यानचा दुसरा टप्पा एप्रिल 2025 मध्ये कार्यान्वित होईल. एकूणच, मुंबईतील 79 किमी लांबीचे मेट्रो नेटवर्क एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. मात्र 'मेट्रो 3' नंतर पुढील मार्गिका सेवेत येण्यासाठी एप्रिल-मे 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.



 हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर

शुक्रवारी मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा