Advertisement

ब्रिटन-भारत विमानसेवा बंदी वाढवली

भारतात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काहीजणांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरील बंदी वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

ब्रिटन-भारत विमानसेवा बंदी वाढवली
SHARES

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचे आता भारतातही २० रुग्ण आढळले आहेत.  त्यामुळे केंद्र सरकारनं ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

भारतात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काहीजणांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरील बंदी वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.  भारतानेही नव्या करोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. मात्र, त्याआधीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांना नवीन विषाणूची लागण झाली होती.  

मंगळवारी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या बुधवारी २० वर गेली आहे. अनेक देशांनी ब्रिटनबरोबर हवाई वाहतूक बंद केली. भारतानेही ३१ डिसेंबरपर्यंत हवाई सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विट करून म्हटलं की, ब्रिटन व भारतादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेल्या विमानसेवेला ७ जानेवारी २०२१ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कडक नियम पुन्हा लागू केले जाणार आहे. 



हेही वाचा -

मुंबईच्या वेशीवर दोन महिन्यांनंतर फास्टॅग बंधनकारक

फायर बाईकसाठी पालिकेची निविदा, निमुळत्या जागेसाठी सोईस्कर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा