Advertisement

अंधेरी आणि ग्रँटरोड स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद

काही दिवसांपुर्वी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकासह कुर्ला आणि घाटकोपर स्थानकातील पूल दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. अशातच आता, पश्चिम रेल्वे प्रशासनानं अंधेरी आणि ग्रँटरोड स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंधेरी आणि ग्रँटरोड स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद
SHARES

सीएसएमटी येथील हिमालया पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच जुन्या पादचारी पुलांच्या दुरुस्तीची काम रेल्वे प्रशासन आणि पालिकेनं हाती घेतली आहेत. काही दिवसांपुर्वी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकासह कुर्ला आणि घाटकोपर स्थानकातील पूल दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. अशातच आता, पश्चिम रेल्वे प्रशासनानं अंधेरी आणि ग्रँटरोड स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


दुरुस्तीसाठी बंद

पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रँटरोड स्थानकातील उत्तर दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव २० आणि २१ एप्रिल रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वर उतरणाऱ्या पायऱ्या आणि दक्षिण दिशेकडील पुलाचा वापर करण्याचं आवाहन पश्चिम रेल्वेनं केलं आहे.


प्रवाशांच्या त्रासात भर

अंधेरी स्थानकातील पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेकडील पायऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. २३ आणि २४ एप्रिल रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवरील पादचारी पूल एका मागोमाग एक दुरूस्तीसाठी बंद करण्यात येत असल्यामुळं प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोर जावं लागत आहे. 



हेही वाचा -

भाजपाला घाबरणार नाही - उर्मिला मातोंडकर

बीडीडी चाळीतील रहिवाशांकडून अरविंद सावंत यांचा निषेध



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा