उत्तर भारतातल्या धुक्याचा मुंबईच्या रेल्वेवर परिणाम

 Pali Hill
उत्तर भारतातल्या धुक्याचा मुंबईच्या रेल्वेवर परिणाम
उत्तर भारतातल्या धुक्याचा मुंबईच्या रेल्वेवर परिणाम
See all

मुंबई - उत्तर भारतात पडत असलेल्या धुक्याचा परिणाम मुंबईहून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांवरही झालाय. धुक्यामुळे होणारी गाड्यांची रखडपट्टी लक्षात घेता तीन दिवसांपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलाय. अनेक गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिरानं येत असल्यानं मुंबईहून रवाना होणाऱ्या लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्याही 7 ते 8 तास उशिरा धावतायत. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडूनही धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलंय.

Loading Comments