अवैध पार्किंगमुळे स्थानिकांना त्रास


  • अवैध पार्किंगमुळे स्थानिकांना त्रास
SHARE

मालाड - मालाड पश्चिमेकडील स्टेशन समोरील रोडवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली. त्यामुळे काही दिवस पादचाऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र या मार्गावर दुकांनासमोरच बेकायदा चारचाकी गाडयांची पार्किंग केली जात आहे. त्यामुळे पादचारी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बेकायदा पार्किगवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. याबाबत पी उत्तर वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.जाधव यांना विचारले असता या जागेची पाहणी करुन चुकीच्या ठिकाणी पार्किंग आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या