Advertisement

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी रिक्षावाल्यांची मोफत सेवा

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्यासाठी नालासोपारा येथील रिक्षावाले पुढे सरसावले असून त्यांना विनामूल्य सेवा देत आहेत.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी रिक्षावाल्यांची मोफत सेवा
SHARES

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून, या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी वगळता सर्वांना संचारबंदी लागू आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्यासाठी नालासोपारा येथील रिक्षावाले पुढे सरसावले असून त्यांना विनामूल्य सेवा देत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव सध्या सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे करोनाबाधित रुग्णांवरील उपचार, संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणा, डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, दळणवळणाची सोय नसल्यानं अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर होतो. त्यामुळं अशा कर्मचाऱ्यांसाठी नालासोपारा येथील रिक्षावाले पुढे आले आहेत. 

नालासोपारा महापालिका रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, पाचारिका, सहायक आणि इतर कर्मचारी तसेच रुग्णालयायापर्यंततील येणारे जाणारे रुग्ण यांना टाळेबंदीत प्रवासाची मोठी गैरसोय होत आहे. महापालिका तसेच एसटी प्रशासनाने काही सुविधा केल्या आहे आहेत. पण त्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने नालासोपारा परिसरातील काही रिक्षावाल्यांनी स्वखर्चाने त्यांना ने- आण करण्याचा निर्धार केला आहे. 

दरम्यान हे रिक्षावाले या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घरातून रुग्णालयापर्यंत नेतात आणि नंतर घरी नेऊन सोडतात. तसंच, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनाही विनामूल्य सेवा देत आहेत. त्यामुळं या रिक्षावाल्यांचं नालासोपाऱ्यात कौतुक होत आहे.



हेही वाचा -

बेस्टप्रमाणं एसटी कर्मचाऱ्यांनाही हवा प्रोत्साहनभत्ता; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

Coronavirus Updates: मुंबईच्या 'या' भागात सर्वाधिक करोनाग्रस्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा