Advertisement

मध्य रेल्वेच्या ३७९ स्थानकात वाय-फाय सुविधा सुरू

मध्या रेल्वे प्रशासनानं आपल्या रेल्वे मार्गावरील ४१५२ किलोमीटर मार्गावर मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे.

मध्य रेल्वेच्या ३७९ स्थानकात वाय-फाय सुविधा सुरू
(Representational Image)
SHARES

लोकलमध्ये येणाऱ्या नेटवर्क इश्यूमुळं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. लोकलमध्ये नेटवर्कच्या अडचणींमुळं प्रवाशांची अनेक कामं खोळंबतात. यासाठी रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सुविधेसाठी लोकलमध्ये वायफायची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्या रेल्वे प्रशासनानं आपल्या रेल्वे मार्गावरील ४१५२ किलोमीटर मार्गावर मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे.

मध्य रेल्वेच्या ३७९ स्थानकात वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. ओएफसी (ऑप्टिकल फायबर केबल) सह मध्य रेल्वेच्या ४१५२ किलोमीटर मार्गावरील मोफत हायस्पीड वाय-फाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीनं सुसज्ज आहेत.

दरम्यान, लोकलमध्ये वायफाय बसविले जात आहेत. परंतू, कोरोनामुळं गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला वायफाय प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळं नवीन वर्षात प्रवाशांना लोकलमध्ये मोफत वायफाय सेवा मिळणार आहे.

एका खासगी कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या १६५ लोकलमधील ३ हजार ४६५ डब्यात वायफाय लावण्याचे काम सुरू आहे. ‘कंटेट ऑफ डिमांड’अंतर्गत लोकलमध्ये बसवण्यात येणाऱ्या वायफाय सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाण्यांचा समावेश असेल.

प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे आवश्यक आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा