Advertisement

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही आता मोफत वायफाय!


कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही आता मोफत वायफाय!
SHARES

रेल्वे प्रशासनाकडून सध्या मुंबई उपनगरीय स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात येत आहे. तशीच वायफाय सेवा आता कोकण रेल्वेनेही आपल्या प्रवाशांना देण्याचे ठरवले आहे. मोफत वायफाय सेवा देऊन कोकण रेल्वे आपल्या प्रवाशांना डिजिटल युगात नेण्याचा प्रयत्न करणार आहे.

या मार्गांवर मिळेल मोफत वायफाय -
कोकण मार्गावरील कोलाड ते मडुरे पर्यंतच्या 28 स्थानकांवर 24 तास मोफत वायफाय सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठी कोकण रेल्वेने मेसर्स सिस्कॉन/जायस्टर कंपनीला कंत्राट दिले आहे. यामुळे रेल्वे स्थानकातील आणि आसपासच्या प्रवाशांना दिवसाचे 24 तास 2 एमबीपीएस वेगाने मोफत वायफायचा आनंद घेता येणार आहे.

एकाच वेळेस 300 जणांना घेता येईल लाभ -
मेसर्स सिस्कॉन/जायस्टर कंपनीने यापूर्वी मुंबई व पुणे येथील शिक्षणसंस्थांमध्ये मोफत वायफाय पुरवले आहेत. ही संस्था आपल्या निधीमधून कोकण रेल्वेला मोफत वायफाय पुरवणार आहे. या सुविधेमुळे एकाच वेळी मोठ्या स्थानकांवर 300, तर छोट्या स्थानकांवर 100 वापरकर्त्यांना मोफत वायफायचा आनंद घेता येणार आहे. लवकरच या सुविधेचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा