Advertisement

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

गुरुवारी१० व्या दिवशीही तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे.

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
SHARES

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. गुरुवारी१० व्या दिवशीही तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून आता मुंबईत पेट्रोलनं ९६ रुपयांची पातळी गाठली आहे.

इंधन दरवाढ झाल्यामुळे लवकरच महागाई वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात ३५ पैसे आणि डिझेलमध्ये ३२ पैसे वाढ केली. गुरुवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.३२ रुपये झाला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती आता ९० रुपये लीटरच्या जवळपास आहेत. या किंमती ८९.८८ एवढा आहे. डिझेल इथं ८० रुपये २७ पैसे लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ९६.३२ आणि डीझेल ८७.३६ रुपये प्रति लीटरनं विकले जात आहे. गुरुवारी पेट्रोल ३५ आणि डीझेल ३२ पैशांनी महागलं आहे.

या महिन्यात गेल्या १४ दिवसांमध्ये १२ व्या वेळा पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. या दरम्यान दिल्लीत पेट्रोल ३.५८ रुपये आणि डीझेल ३.७९ रुपये महाग झाले. यापूर्वी जानेवारीमध्ये रेट १० वेळा वाढला होता. या दरम्यान पेट्रोल २.५९ रुपये आणि डीझेल २.६१ रुपयांनी महाग होते. यावर्षी आतापर्यंत २२ वेळा पेट्रेल ६.१७ रुपये आणि डिझेल ६.५० रुपये प्रति लीटरनं महाग झाले आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा