Advertisement

लसीकरण झालेल्या प्रवाशांना मिळणार आता दैनंदिन तिकीट

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे देण्यास राज्य सरकारने रविवारी मंजुरी दिली.

लसीकरण झालेल्या प्रवाशांना मिळणार आता दैनंदिन तिकीट
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे देण्यास राज्य सरकारने रविवारी मंजुरी दिली. पूर्ण लसीकरण होऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वेनेही रविवारपासूनच दैनंदिन तिकीटविक्रीस सुरुवात केली. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दोन्ही लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र रेल्वे स्थानकातील पालिका कर्मचाऱ्यांकडून प्रमाणित केल्यानंतर ते तिकीट खिडक्यांवर दाखवावे लागेल. ते दाखवल्यावर प्रवाशांना तिकीट मिळेल किंवा ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ दाखवूनही तिकीट घेता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले. दैनंदिन तिकिटे दिली जात नसल्याने विनातिकीट प्रवाशांची संख्याही वाढली होती.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानेच राज्य सरकारने जास्तीत जास्त निर्बंध शिथिल करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे वितरित करण्यास परवानगी दिली. त्यानंतर लगेचच रेल्वेने खिडक्यांवर तिकीटविक्री सुरू केली.

राज्य सरकारच्या निर्णयाने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यातही दिवाळीपूर्वी हा निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

युनिव्हर्सल पास सक्तीचा

लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना दैनंदिन तिकिटे देण्यास परवानगी दिल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांनी रेल्वेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार मासिक पासाप्रमाणेच खिडकीवर तिकीट खरेदीसाठी ‘युनिव्हर्सल पास’ दाखवणे बंधनकारक असेल. युनिव्हर्सल पास असेल तरच तिकीट मिळेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा