Advertisement

चाकारमान्यांनो गणपतीला कोकणात जाण्यासाठी व्हा तयार


चाकारमान्यांनो गणपतीला कोकणात जाण्यासाठी व्हा तयार
SHARES

गणपतीला गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना 5 महिन्यांपूर्वीच तयारी करावी लागते. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण 120 दिवस आधी सुरू होत असल्याने चाकरमान्यांना आतापासूनच तयारीला लागावे लागणार आहे. यावर्षी शुक्रवार, 25 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे कोकण वा मध्य रेल्वेच्या गाड्यांचे तिकीट आरक्षित करण्यासाठी भाविकांना 21 एप्रिलपासूनच तयारी करावी लागणार आहे. 

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल होत असल्याने आगाऊ आरक्षणासाठीची लगबग अवघ्या 11 दिवसांत सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी कोकण आणि मध्य रेल्वेच्या नियमित आणि जादा गाड्यांच्या तिकिटांसाठी गर्दी उसळते. त्यामुळे चाकरमान्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जाण्यापूर्वीच गौरी-गणपतीचे आरक्षण करावे लागणार आहे. 

गणपतीत कोकणात जाणारे चाकरमानी जास्त असल्यामुळे कोकण मेल, खासगी वाहने, लक्झरी बसेसनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. प्रवाशांकडून मेलची मागणी होते. ऐनवेळी तिकीट मिळत नसल्याने आगाऊ आरक्षण करण्याची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे.

आरक्षणाची तारीख प्रवासाची तारीख

21 एप्रिल
19 ऑगस्ट 17

शुक्रवार
22 एप्रिल
20 ऑगस्ट 17
 रविवार

23 एप्रिल
21 ऑगस्ट 17
 सोमवार

24 एप्रिल
22 ऑगस्ट 17
मंगळवार

25 एप्रिल
23 ऑगस्ट 17
 बुधवार

26 एप्रिल
24 ऑगस्ट 17
  गुरुवार

27 एप्रिल
25 ऑगस्ट 17
 शुक्रवार

28 एप्रिल
26 ऑगस्ट 17
 शनिवार

29 एप्रिल
27 ऑगस्ट 17
 रविवार

30 एप्रिल
28 ऑगस्ट 17
 सोमवार

1 मे
29 ऑगस्ट 17
मंगळवार

2 मे
30 ऑगस्ट 17
 बुधवार

3 मे
31 ऑगस्ट 17
 गुरुवार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा