Advertisement

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या तिकिट बुकिंगला 'या' तारखेपासून सुरुवात

यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे.

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या तिकिट बुकिंगला 'या' तारखेपासून सुरुवात
SHARES

गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबईतील हजारो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जातात. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून गणेशोत्सवाच्या काळातील गाड्यांचे बुकिंग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. त्यासाठी येत्या १६ मे पासून गणपतीसाठीच्या रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु होणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होते. त्याप्रमाणेच यंदा १६ मे पासून तिकीट बुकिंगला सुरुवात होईल.

कोकणातील गाड्यांचे आरक्षण

  • मंगळवार १६ मे रोजी १३ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण होईल
  • बुधवार १७ मे - १४ सप्टेंबर रोजी पाच दिवस आधीचे आरक्षण
  • गुरुवार १८ मे १५ सप्टेंबर रोजी चार दिवस आधीचे आरक्षण
  • शुक्रवार १९ मे १६ सप्टेंबर रोजी तीन दिवस आधीचे आरक्षण
  • शनिवार २० मे - १७ सप्टेंबर रोजी दोन दिवस आधीचे आरक्षण
  • रविवार २१ मे - १८ सप्टेंबर (हरितालिका)
  • सोमवार २२ मे - १९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
  • मंगळवार २३ मे - २० सप्टेंबर (ऋषी पंचमी)
  • बुधवार २४ मे - २१ सप्टेंबर (गौरी आगमन)
  • गुरुवार २५ मे - २२ सप्टेंबर (गौरी पूजन)
  • शुक्रवार २६ मे - २३ सप्टेंबर (गौरी विसर्जन)

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकण आणि मध्य रेल्वेने संयुक्तपणे २६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या सर्व गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबतील.

www.irctc.co.in या संकेतस्थळावर आजपासून विशेष शुल्कासह या गाड्यांचे तिकीट बुकिंग सुरु झाले आहे.



हेही वाचा

मुंबई- गोवा मार्गावर अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने आकारता येणार दंड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा