Advertisement

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने आकारता येणार दंड

रेल्वेमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाश्यांकडून दंड आकारण्यासाठी एका मोबाइल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने आकारता येणार दंड
Representational Image
SHARES

लवकरच मध्य रेल्वेमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाश्यांकडून दंड आकारण्यासाठी एका मोबाइल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे.

३ मे (बुधवार) रोजी हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. मध्य रेल्वेमध्ये असलेले टीसी या अ‍ॅपचा वापर करु शकणार आहे. तसेच या विभागातील ५० टीसींना बॉडीकॅमचा वापर करणे शक्य होणार आहे.

जेव्हा विना तिकीट प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाश्याला टीसी पकडतात, त्यावेळी रोख नोटा नसल्याचे किंवा सुट्टे पैसे नसल्याचे कारण दिले जाते. लोकांकडे पैसे नसल्यामुळे टीसींना त्या व्यक्तीला काही तासांनंतर सोडावे लागते.

मध्य रेल्वेमध्ये कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ तिकीट तपासकानुसार, “तिकीट नसताना पकडले गेल्यावर ५० टक्के प्रवासी रोख पैसे जवळ नसल्याचे किंवा सुट्टे पैसे नसल्याची सबब देतात. दंड टाळल्यासाठी वापरले जाणारे हे सर्वात लोकप्रिय कारण आहे. याशिवाय गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये किंवा स्थानकावरील गर्दीमध्ये नोटा सांभाळणे काही वेळेस त्रासदायक ठरते.”

रोख नोटा, सुट्टे पैसे नसणे यांमुळे अनेकदा दंड आकारण्यासाठी पेमेंट अ‍ॅप्सवरुन स्वत:च्या खासगी अकाउंटचा वापर करावा लागतो. कामाच्या ठिकाणी वैयक्तिक खात्यांचा वापर केल्याने टीसींना त्रास होऊ शकतो. या समस्यांमुळे मध्य रेल्वेने बँकेच्या सहाय्याने टीसींकरिता दंड आकारण्याचे अ‍ॅप विकसित केले आहे.

मध्य रेल्वेच्या या नव्या उपक्रमामध्ये बॉडीकॅम्सचा समावेश करण्यात येणार आहे. यानुसार कामावर असणाऱ्या टीसींच्या शर्टच्या खिशाजवळ बॉडीकॅम (कॅमेरे) लावले जाणार आहेत. या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडीओ किमान महिनाभर स्टोअर केले जाऊ शकतात असे म्हटले जात आहे.

तिकीट तपासताना पारदर्शकता राहावी आणि प्रवाशांकडून तक्रार नोंदवल्यास हा प्रश्न सोडवण्यासाठी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओजची मदत घेतली जाणार आहे.



हेही वाचा

मुंबई- गोवा मार्गावर अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू

मेट्रो 8 मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडेल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा