Advertisement

गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ

भक्तांसाठी मेट्रोच्या अधिक फेऱ्या

गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 च्या सेवांच्या वेळेत वाढ केली आहे. तसेच एक्वा लाईन 3 च्या वेळेतही वाढ केली आहे. 

27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत मेट्रो आता रात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे, असे एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रोने जाहीर केले आहे. गणेशोत्सवाचा आनंद भाविकांना साजरा करता यावा यासाठीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 10 दिवसांच्या उत्सवासाठी लागू राहील.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मेट्रो लाईन ३ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅक्वा लाईन मेट्रोचे कामकाजाचे तास 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत मध्यरात्रीपर्यंत वाढवले जातील. या काळात, दररोज सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंत सेवा सुरू राहतील. ज्यामुळे भाविक आणि प्रवाशांना संपूर्ण उत्सवादरम्यान सुरळीत प्रवास करता येईल.

सध्या आरे जेव्हीएलआर ते वरळी दरम्यान 22 किमीचा मार्ग कार्यरत आहे. संपूर्ण मार्ग 33 किमीचा आहे आणि कफ परेड कुलाबा पर्यंतचा अंतिम टप्पा लवकरच उघडला जाणार आहे. सध्या, चाचणी सुरू आहे आणि उर्वरित मार्ग व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्यासाठी मेट्रो रेल सेफ्टी आयुक्त (सीएमआरएस) यांच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहे.

वेळेत वाढ

अंधेरी पश्चिम (लाईन 2A) आणि गुंदवली (लाईन 7) या दोन्ही ठिकाणांहून शेवटची गाडी रात्री 12 वाजता सुटेल. याआधी ही सेवा रात्री 11 वाजता बंद होत होती.

अतिरिक्त फेऱ्या

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार तसेच शनिवार आणि रविवारसाठी अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोमवार ते शुक्रवार 317 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त). गर्दीच्या वेळी दर 5.50 मिनिटांनी एक गाडी मिळेल. शनिवारी 256 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त) असतील. गर्दीच्या वेळी दर 8.06 मिनिटांनी एक गाडी उपलब्ध असेल. तर रविवारी 229 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त) असतील. या दिवशी दर 10 मिनिटांनी एक गाडी धावेल, आणि गरज पडल्यास अतिरिक्त फेऱ्यांचीही सोय केली जाईल.



हेही वाचा

मोनोरेलची प्रवासीक्षमता निश्चित, गाड्यांचीही तपासणी होणार

इलेक्ट्रिक वाहनांसाठी अटल सेतूवर टोल माफ

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा