Advertisement

कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव विशेष रेल्वे आणि एसटी बस फुल

येत्या ३ दिवसांत मुंबईसह राज्यात गणपतीचे आगमन होणार आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव विशेष रेल्वे आणि एसटी बस फुल
SHARES

येत्या ३ दिवसांत मुंबईसह राज्यात गणपतीचे आगमन होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाच सावट आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानं यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे गणपती स्पेशल ट्रेनची संख्यादेखील वाढविण्यात येत असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

कोकणात जाण्यासाठी एकीकडे रेल्वेगाड्या फुल होत आहेत तर दुसरीकडे एसटीचेही आरक्षण फुल झाले आहेत. मात्र प्रवाशांची संख्या वाढत असवल्यानं आणखी गाड्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनापूर्वी एसटीच्या १२ हजार गाड्या सोडण्यात येत होत्या तर प्रवासी ५ लाख होते आता २,३०० गाड्या असून प्रवासी संख्या १ लाख झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एसटी आणि रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवाशांची त्यांच्या गावांमध्येच याद्या करून ज्यांचे २ डोस किंवा कोरोना चाचणी झाली नसेल त्यांची गावातच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तर खासगी ट्रॅव्हल्सने येणाऱ्याची चेकपोस्टवर माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने जाणाऱ्यांनी आता एसटी आणि रेल्वेकडे धाव घेतली आहे. यामुळे एसटीच्या आणखी गाड्या आरक्षित होतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा