Advertisement

थर्टी फर्स्टला मुंबई-मांडवा फेरीबोट सेवा बंद


थर्टी फर्स्टला मुंबई-मांडवा फेरीबोट सेवा बंद
SHARES

यंदा थर्टी फर्स्ट आणि रविवार हा योग जुळून आला आहे. त्यामुळे यावेळी थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी बोटीने अलिबागला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तो प्लॅन तुम्हाला रद्द करावा लागेल. कारण यंदा गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाणाऱ्या सर्व फेरी बोट सेवा ३१ डिसेंबर रोजी बंद राहणार आहेत.



किती वेळ राहणार बंद?

यंदा ३१ डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेत गेट वे ऑफ इंडियावरून सुटणाऱ्या फेरी बोट सेवा ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते सोमवारी १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय फेरी बोट मालकांनी घेतला आहे.



'मुंबई लाइव्ह'ने या फेरी बोट मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ३१ डिसेंबर रोजी होणारी गर्दी पाहता फेरी बोट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मालदार, अजंता आणि पीएनपी या जेट्टी कंपनींकडून गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग जेट्टी सेवा दिली जाते.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा