SHARE

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडीची समस्या टाळण्यासाठी पोलिसांनी नवी संकल्पना आणली आहे. सुट्ट्या आणि वीकेंडला एक्स्प्रेस वेवर गोल्डन अवर्स लागू करण्यात आलाय. यामध्ये अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. या नियमाची महामार्ग पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विकेंडला खास करून सुट्टयांच्या काळात वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यावर वाहतूक पोलिसांनी गोल्डन अवर्सची संकल्पना काढली. गोल्डन अवर्सनुसार सुट्टयांच्या आणि विकेंडच्या काळात एक्सप्रेस वेवर अवजड वाहनांना नो एण्ट्री असणार आहे. अवजड वाहनं या काळात एक्सप्रेस वेवरून धावणार नसल्यानं वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. 

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या