आरपीएफनं परत केला विसरलेला प्रिंटर

 Kandivali
आरपीएफनं परत केला विसरलेला प्रिंटर

बोरीवली - आरपीएफ अधिकारी जय सिंह रघुबंशी यांनी 10 हजारांचा प्रिंटर प्रवाशाला परत केला आहे. राजेश सुतार नावाचे प्रवासी आपला हा प्रिंटर गाडीमध्येच विसरले होते. कांदिवली कारशेडमध्ये उभ्या असलेल्या गाडीमध्ये हा प्रिंटर एच. सी. सतीश यांना सापडला. त्यांनी तो आरपीएफ अधिकारी जय सिंह रघुबंशी यांना दिला. त्यासोबतच त्यांना एक मोबाइल नंबरही त्यात सापडला. त्या नंबरवर फोन केला असता राजेश सुतार यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर त्यांची योग्य ती चौकशी आणि खातरजमा करून तो प्रिंटर त्यांना परत करण्यात आला. आपला प्रिंटर परत मिळाल्यानं राजेश सुतार यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक करून त्यांचे आभारही मानले.

Loading Comments