Advertisement

हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकल


हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकल
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्बर मार्गावर आता गोरेगाव ते पनवेल लोकल धावणे शक्य होणार आहे. पनवेल ते अंधेरी अशा अप व डाऊन मार्गावरील १८ लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार केला जाणार आहे. या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी एका महिन्यानंतर केली जाणार आहे. 

सीएसएमटी ते अंधेरी ते सीएसएमटी मार्गावरील ४४ लोकल फेऱ्यांचाही गोरेगावपर्यंत विस्तार होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावर एकूण ४२ लोकल फेऱ्या होतात. याशिवाय सीएसएमटी ते अंधेरी ते सीएसएमटी आणि पनवेल ते अंधेरी ते पनवेल मार्गावरही दररोज ६२ लोकल फेऱ्या धावतात. परंतु गोरेगाव ते पनवेल लोकल नसल्याने वसई, विरार, बोरिवली ते मालाड, गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना अंधेरी स्थानक गाठावे लागते. हीच परिस्थिती नवी मुंबईकरांचीही होते. त्यांना अंधेरी स्थानकात उतरल्यानंतर गोरेगावपर्यंत जाण्यासाठीही पुन्हा दुसऱ्या लोकलचा पर्याय स्वीकारावा लागतो.

गोरेगाव ते पनवेल अशी थेट हार्बर सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून होऊ लागली. त्यानंतर गोरेगाव ते पनवेल लोकलचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत होते. २०२० मध्ये हार्बरवरील अंधेरीपर्यंतच्या एकूण ६२ लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याची अंमलबजावणीही केली जाणार होती.

हार्बवरील फेऱ्यांच्या विस्ताराच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी एका महिन्यानंतर करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासनानं केला आहे. यात अंधेरी ते पनवेल लोकल फेऱ्या गोरेगावमधून सुटतील, तर पनवेलहून अंधेरीपर्यंत जाणाऱ्या लोकल गोरेगावपर्यंत धावतील. सीएसएमटी ते अंधेरी असलेल्या लोकल फेऱ्यादेखील गोरेगावपर्यंत धावणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा