अशा प्रकारे होईल मुंबई रेल्वेचा विकास

  Mumbai
  अशा प्रकारे होईल मुंबई रेल्वेचा विकास
  मुंबई  -  

  मुंबईमधील उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आराखड्यातील प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तर अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाचे काम डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे. ठाणे-दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याचे काम मार्च 2019 पर्यंत, तर मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम मार्च 2021 पर्यंत, सीएसटी ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका मार्च 2021 पर्यंत टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
  या प्रकल्पाचा खर्च राज्य शासन आणि केंद्र शासन 50-50 या प्रमाणात करणार आहेत. एमयूटीपी-2 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 5 हजार 300 कोटी इतका होता. या प्रकल्पासाठी जागतिक बँक कर्ज सहाय्याची रक्कम 1 हजार 190 कोटी आहे. या प्रकल्पावर नोडल एजन्सी म्हणून मुंबई रेल्वे विकास महामंडळास राज्य सरकार 50 टक्के रक्कम अदा करणार आहे.

  एमयूटीपी-2 प्रकल्पअंतर्गत खालील कामे करण्यात येतील

  नवीन उपनगरीय रेल्वे गाड्या खरेदी करणे
  उपनगरीय रेल्वे गाड्यांची देखभाल करणे
  रेल्वेमार्गाच्या विद्यूत प्रवाहाचे डीसीमधून एसीमध्ये परिवर्तन करणे
  अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्ग विस्तार
  ठाणे-दिवामध्ये पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका टाकणे
  मुंबई सेंट्रल आणि बोरिवलीमध्ये सहावी रेल्वे मार्गिका टाकणे
  स्थानक सुधारणा
  रेल्वे रुळाच्या कडेला संरक्षण भिंत बांधणे
  प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करणे
  बारा डब्यांच्या 72 नवीन गाड्या खरेदी करणे

  तसेच वांद्रे- विरार उन्नत रेल्वे प्रकल्पासाठी 19 हजार 502 कोटी रुपये अपेक्षित आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस-पनवेल उन्नत जलद रेल्वे प्रकल्पासाठी 14 हजार 525 कोटी खर्च अपेक्षित आहे. विरार-वसई-पनवेल उपनगरीय रेल्वे मार्गासाठी 10 हजार 587 कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.