जलमार्गाद्वारे हज यात्रा पुन्हा सुरु होणार?

 CST
जलमार्गाद्वारे हज यात्रा पुन्हा सुरु होणार?
जलमार्गाद्वारे हज यात्रा पुन्हा सुरु होणार?
See all

भविष्यात जलमार्गाद्वारे हज यात्रा पुन्हा सुरु करण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. मुंबईतील हज हाऊस येथे हज 2017 संदर्भात आयोजित एका प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

जलमार्गाद्वारे 'जेद्दाह' या शहरात जाण्याचा मार्ग 1995 मध्ये बंद झाला होता. सध्या देशभरातील 21 ठिकाणांहून हवाई मार्गाद्वारे यात्रेकरू हजयात्रा करत आहेत. जलमार्गाद्वारे हजयात्रेच्या पर्यायामुळे प्रवासाचा खर्च निम्म्याहून कमी होणार आहे. नवी समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल, असे मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.

हज 2017च्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी एकूण प्राप्त अर्जांपैकी 1,29,196 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत. ज्यामुळे ‘डिजिटल इंडिया’ची भारताची वाटचाल दिसत आहे

- मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री

Loading Comments