मुंबई - महिला प्रवाशांना आता खुशखबर. महिलांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये तेजस्विनी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्स रकारने घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 2016-17 च्या अर्थसंकल्पात तेजस्विनी बस या नावाने स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या शहरांमध्ये महिलांसाठी 300 तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या योजनेंतर्गत सकाळी 7 ते 11 तसेच सायंकाळी 5 ते रात्री 9 या कालावधीत सुटणाऱ्या बसेसमधील 100 टक्के आसने महिलांसाठी आरक्षित असतील. तसेच या बसेससाठी तिकीटाचे दर संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील प्रचलित तिकीट दरानुसार असणार आहेत.