मुंबईत धावणार बेस्टच्या इलेक्ट्रीक मिडी बस

  Pali Hill
  मुंबईत धावणार बेस्टच्या इलेक्ट्रीक मिडी बस
  मुंबई  -  

  मुंबई – बेस्ट उपक्रमानं सहा बॅटरी प्रवर्तित इलेक्ट्रिक मिडी बिगर वातानुकूलीत बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला गुरूवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार मार्च 2017 पर्यंत या सहाही बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे मार्चपासून मुंबईच्या रस्त्यांवरून इलेक्ट्रिक बस धावतील.

  या बस खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेनं बेस्टला 10 कोटी रुपयांचा निधी दिला असून हा निधी मार्च 2017 पर्यत वापरणे बंधनकारक असल्यानं इलेक्ट्रीक बसगाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव तातडीनं मांडत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. सहापैकी दोन गाड्या मोठ्या असणार आहेत. तर चार मिडी बसगाड्या असणार आहेत. मिडी गाड्यांची आसनक्षमता 34 अशी असणार असून या गाड्यांचे आयुमान 15 वर्षे असणार आहे. साडे तीन तासांत या गाड्या 180 किमीचा प्रवास करतील. संपूर्ण कोटेड एस स्टिल बॉडीच्या या गाड्या असणार आहेत. पण याला सदस्यांनी विरोध केल्यानं आता अॅल्यूमिनियममध्ये गाडी बांधण्याची सुचना कंपन्यांना करण्यात येणार आहे. तर या गाड्यांची बॅटरी चार्ज करण्यासाठी प्रत्येक डेपोत व्यवस्था करण्यात येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.