Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ८,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ८,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक
SHARES
Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जीव्हीके समूह उभारणार आहे. या विमानतळावरून प्रारंभी दरवर्षी १ कोटी प्रवाशांची ये-जा होण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. याबाबत जीव्हीके रेड्डी यांनी बुधवारी माहिती दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सार्वजनिक-खाजगी भागीदारी उपक्रम आहे. यामध्ये जीव्हीकेच्या नेतृत्वाखालील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सिडकोसोबत ७४ टक्के भागिदारी आहे. तसंच, प्रकल्पासाठी असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या नोडल एजन्सीची २६ टक्के भागीदारी आहे.

६ कोटी प्रवासी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ११६० एकरमध्ये अनेक टप्प्यात उभारण्यात येणार आहे. या विमानतळाची वार्षिक क्षमता ६ कोटी प्रवासी इतकी असेल. जीव्हीके पावर अॅण्ड इंफ्रा लिमिटेड (जीव्हीकेपीआयएल) या कंपनीच्या वार्षिक बैठकीत रेड्डी यांनी शेअरधारकांना सांगितलं की, पहल्या टप्प्यात या विमानतळावर जवळपास ८ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

त्याशिवाय, पहिल्या टप्प्यात या विमानतळाची क्षमता १ कोटी प्रवासी इतकी असणार आहे. त्याचप्रमाणं, २,५०० किंवा ३००० कोटी रुपये खर्च केल्यास प्रवासी क्षमता २ कोटीवर जावू शकते. हेही वाचा -

महिला लोकल डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रवाशांना प्रतिक्षाच

महापालिकेतील नगरसेवकांची कामगिरी घसरली, प्रजा फाऊंडेशनचा अहवालसंबंधित विषय
Advertisement