Advertisement

महिला लोकल डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रवाशांना प्रतिक्षाच

महिला प्रवाशांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यासाठी लोकलच्या महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार होते. परंतु, मागील ४ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला या कामात चांगली प्रगती करता आली नाही.

महिला लोकल डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रवाशांना प्रतिक्षाच
SHARES

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनानं अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या महिला प्रवाशांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यासाठी लोकलच्या महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार होते. परंतु, मागील ४ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला या कामात चांगली प्रगती करता आली नाही. ही सुविधे अंर्तगत पश्चिम व मध्य रेल्वेच्या १ हजार ७ महिला डब्यांपैकी फक्त २८९ महिला डब्यांतच कॅमेरे आणि ८ लोकलच्या महिला डब्यांमध्ये टॉकबॅकसारखी यंत्रणा बसवली आहे.

महिला लोकल डबा

लोकलच्या महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं घेतला होता. त्यानुसार आतापर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावरील ३३७ महिला डब्यांपैकी १२९ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसंच, मध्य रेल्वेवरील ६७० डब्यांपैकी १६० महिला डब्यांत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय, लोकलमधील मोटरमन आणि गार्डशी संवाद साधण्यासाठी महिला डब्यात टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार होती. मात्र, ही सुविधा देखील रखडली असून, अद्याप पश्चिम रेल्वेवरील २ आणि मध्य रेल्वेवरील ४ लोकलच्या डब्यांमध्येच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे

लोकलच्या महिला डब्यांसोबत मेमू, डेमू गाड्यांच्या सर्वच डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं एप्रिलमध्ये घेतला होता. त्यानुसार, १० हजार ३४९ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मात्र, अद्याप ही सुविधा कार्यान्वित करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनं उशीर करत असल्याचं माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

महापालिकेतील नगरसेवकांची कामगिरी घसरली, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

शिवसेना-भाजप युतीबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा