Advertisement

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ दुधाचा टँकर उलटला

पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ दुधाचा टँकर उलटला
SHARES

पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर येणाऱ्या असलेल्या आडोशी बोगद्याजवळ दुधाचा टॅंकर उलटला. त्यामुळं पुण्याहुन मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर खंडाळापर्यंत वाहतुककोंडी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरून दुधाचा टॅंकर बाजूला काढण्यासाठी घटनास्थळी आयआरबी यत्रंणा, महामार्ग वाहतुक पोलीस दाखल झाले असून टँकर बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळं महामार्गावर ४ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई-पुणे मार्गावर दररोज अनेक वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावरून गाड्या भरधाव वेगानं जात असल्यानं अपघाताचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं या अपघातांच्या वाढलेल्या प्रमाणावर आळा घालण्याासाठी वाहतूक पोलिसांनी याआधीच वाहन चालवताना वेग कमी ठेवण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, असं असलं तरी वाहन चालक भरधाव वेगानंच गाड्या चालवतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा